Skip to main content

Posts

घोरी पृथ्वीराज आणि हिंदू,,,,

 *घोरी पृथ्वीराज आणि हिंदू,,,,* नवहिन्दुदेशभक्त अक्षयकुमारचा पृथ्वीराज सिनेमा येतोय,,, त्यानिमित्ताने थोडी उजळणी झाली तर ,,,, *कस दुसऱ्यांवर टीका करणं या सारख सोप्प काम नाही त्यातही आपल्या चुकांकडे सहेतुक दुर्लक्ष करायचं असेल तर नवहिंदूं मध्ये नेहमीच नवचैतन्य बहरत असत,,,* *पुढे काही बोलण्याआधी एक सत्य सांगणं जरुरी आहे या देशावर चालून आलेली घोरी ही जमात हिंदूं मधील बाटवली गेलेली होती हे आधी लक्षात घ्या ही बाटवलेले लोक जास्त कडवे असतात हे एकदा लक्षात घेतलं की स्वतःच्या चुका आरशा समोर येतात शहाणे चुकां मधून शिकतात हिंदू कधीच शिकत नाही* *जो पर्यंत हिंदू आपल्या चुका मान्य करत नाही जो पर्यंत त्या चुका सुधारायच काम करत नाही तोवर हिंदू रडतच राहणार* असो नमनालाच घडाभर तेल नको,,, *परकीयांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराच मूल्यमापन करण्या आधी हिंदूंच्या मूर्खपणाच मूल्यमापन झालं तर ते जास्त उत्तम,,,  कारण या देशावर आजवर ज्या ज्या म्हणून काही स्वाऱ्या झाल्या मग तो अलेक्झांडर, शक आले हुण आले बहुतांशी ही सारी राजकीय आक्रमण होती ती ती इथल्या राजांनी आर्य चाणक्य चंद्रगुत मौर्य या सारख्या ...
Recent posts

आंधी

 आंधी,,,, काल मित्राने गाणं पाठवलं  *तुम आ गये हो नूर आ गया है*,,,,,, आणि झापटल्या सारखा सिनेमा डाऊनलोड केला आणि हरवून गेलो सुचित्रा सेन आणि संजीव कुमार,,,, 💕💞💞👌 संजीवकुमार,, त्याच्याकडे अमिताभची उंची धर्मेंद्रची शरीरयष्टी शम्मीचा धसमुसळेपणा राजेशखन्नाच मार्केटिंग काही काही नव्हतं एक गोलमटोल हिरो खात्यापित्या घरचा,,,,, पण त्याच्याकडे होत ते अभिनयाच खणखणीत नाणं होत,,,, आणि स्वतः मी शम्मी राजेश खन्ना धर्मेंद्र अमिताभ यांचा फॅन असलो तरीही *शोले आजही पाहतो ते केवळ हात नसलेला संजीव कुमार डोळ्यातून आग ओकत गब्बरसिंग ला केवळ पायांनी चिरडून मारणारा म्हणूनच संजीव कुमारचा म्हणूनच धर्मेंद्र अमिताभ आणि गब्बर यांना पुरुन उरतो तो* असो,,,, कथा तशी नेहमीचीच श्रीमंत बापाची स्वतःची तत्व जपत स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येऊ पाहणारी ती,,, आणि आपल सरळ साधं कुठलेही छक्केपंजे नसलेल आयुष्य जगत आपली नोकरी आणि आपली कविता या पलीकडे कुठलीही अपेक्षा नसणारा तो,,,, सिनेमा सुरू होतो ती एक मोठ्ठी नेता झालेली असते आणि तो अजूनही एका हॉटेलचा मॅनेजर,,,, तब्बल 9 वर्षांनी भेट होते आणि मग,,,,, *तो;-ये जो चांद है ना...

*तानसेन गुरुपौर्णिमा आणि बाळासाहेब*

 *||श्री गुरुवे नमः ||* अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,, तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,* एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,, निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,, या शिष्याला त्यांनी भरभरून दिले आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले  सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता, आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं सारेजण त्यांचा जयजयकार करत होते आता वेळ...

नर्मदेतला प्रत्येक दगड हा शाळीग्राम नसतो

 #बंडातात्या,,,, काल ,,, उद्धवजींना सांगितलं पांडुरंगाच्या पूजेला तुम्ही येऊ नका तो पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही,,,, (खरतर माझा गैरसमज असेल पण माझं मराठी खूप चांगलं आहे आणि त्या माझ्या मराठीत खूप चांगलं उत्तर देऊ शकलो असतो पण ते टाळतो असो,,,) पण पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही हे तुमचं विधान ऐकल्यावर एक लक्षात आलं की तुम्हला #वारी कळलीच नाही,,, आता वारीला का जावं हे ही सविस्तर सांगत नाही पण साधारण 25 वर्षापूर्वीचा माझ्या समोर घडलेला प्रसंग सांगतो (आपल्याकडे #दृष्टांत म्हणतात त्याला,,) माझे तात्या विणेकरी त्यामुळे मला दर्शनाला कधी अडचण आलीच नाही पण एकदा मात्र चुकामूक झाली आणि तात्या पुढे निघून गेले आता काय करायचं दर्शन कस घ्यायचं,,,? मग ओळख पाळख काढत मी कसा बसा दर्शन बारीत घुसलो तास दोन तासात तिथे आजूबाजूचे वारकरी यांच्याशी गप्पा ही मारायला लागलो साधारण नन्तर लक्षात आलं की एक माझ्या 10/12 मागे एक वारकरी उभा होता जो आंधळा होता तो पर्यंत मी माहिती काढली होती वारकरी किती दिवस झाले रांगेत उभे आहेत मग मात्र माझं कुतूहल जाग झालं ,, राहवलं नाही मला कारण लोक सारी 2/3दिवस झाली होत...

ड्रीम गर्ल

 भडक वेबसिरीजच्या काळात एक हलका फुलका मन प्रसन्न थोडा अमोल पालेकरच्या गोलमाल सारखा निखळ करमणूक करणाऱ्या एका बेरोजगार तरुणाची #आयुष्यमानखुराणा ची कथा नोकरी मिळवण्यासाठी खटपतीतून सहज म्हणून केलेली गम्मत त्याला सोन्याचे दिवस दाखवते आणि मग त्यातून पुढे जो गोंधळ उडतो ते सारं पाहण्यासारखं त्यातही #अन्नूकपूर सारखा बाप असेल तर😆👌👌👌👌 या बाप नटाचा गोंधळ तर अप्रतिम त्यातून तो लग्नासाठी मुसलमान होतो ते का तो सारा गोंधळ पाहणं म्हणजे  गोंधळात गोंधळ😆😆👍👍😆😆👌

हसीन दिलरुबा

 *तापसी पन्नू* *#हसीन_दिलरुबा* ज्यांनी कुणी तरुणपणी रहस्य कथा किंवा इतर कथा वाचल्या असतील त्यांना सिनेमा त्या विश्वात घेऊन जाईल,,, या चित्रपटात देखील दिनेश पंडित यांच्या रहस्य कथेचा आधार घेत चित्रपट बेतला आहे आणि ज्यांना हा थरार अनुभव असेल त्यांनीही जरूर पहावा असा चित्रपट,,, एका सुंदर पण थोडं वय झालेल्या आणि जोडीदारा बाबत खूप अपेक्षा असलेल्या एका सुंदर मुलीची कथा,,,,, अनेक मुल अनेक खोट काढून झाल्यावर एक सर्वसामान्य मुलाशी तीच लग्न होत तिच्या स्वप्नातला तो राजकुमार नसतो अर्थातच पुढे खटके भांडण होतात ती विकोपाला जातात त्यातच घरी दिराच,,,, एका डॅशिंग दिराच,,  तिच्या *स्वप्नातल्या राजकुमारच* आगमन होत आणि  *वसंताच आगमन व्हावं आणि पाना फुलांना बहर यावा तसं तीच आयुष्य सुंदर होत,,,* साधा चहा देखील न बनवता येणारी ती त्या राजकुमारासाठी मटण ही बनवते त्याच्या प्रेमात आकंठ बुडते,,,  आणि,,,,, *पागलपन की हद की से जो ना गुजरे वो प्यार कैसा होश मे रिशते निभाये जाते है,,,,.* अशी टॅग लाईन घेत सिनेमा बनवला आहे आता *पागलपन काय किती कस त्याचा अनुभव जरूर घ्या आहाहा,,, भारी👌👌* अवश्य बघावा...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...

शुक्राचार्य आणि मराठी माणूस,,,,

लायकी पात्रता असूनही डावलले गेलेले शुक्राचार्य दानवां च गुरुपद स्वीकारतात,, आणि दानवांची सरशी व्हावी म्हणून ते संजीवनी मंत्रविद्या मिळवण्यासाठी भगवान शंकराला शरण जातात भगवान शंकराचा भोळेपणा सारे देव जाणून असतात त्यामुळे देवलोकात एकच हलकल्लोळ माजतो,,, आपलं पद जाईल या भीतीने देवेंद्रही शंकराला शरण जातात पण भगवान शंकर भोळे असले तरी संजीवनी मंत्र काय त्याची ताकद काय त्याचा फायदा नुकसान काय या मंत्राचा गैरवापर देव लोकांना किती भारी पडू शकतो हे ते पक्के जाणून असतात,,, म्हणून ते अट घालतात,,,, *पुढील एक वर्ष झाडाला स्वतःला उलट टांगून घेऊन केवळ खाली पडलेल्या पानांचा धूर सेवन करायचा बाकी काहीही अन्न वा पाणी ग्रहण करायचं नाही केवळ त्यालाच हा संजीवनी मंत्र मिळेल,,,,* ही अट शुक्राचार्य स्वीकारतात,,, ही अट ऐकल्यावर अर्थातच देवेंद्र या अटी पासून पळ काढतात,, आणि ह्या ह्याला काय जमणार म्हणत शुक्राचऱ्याची टिंगल ही उडवतात,,, इकडे शुक्राचार्यांचं तपाच अनुष्ठान सुरू होत,,, *देवेंद्र नेहमी प्रमाणे हे तप सिद्धीस जाऊ नये म्हणून* *प्रयत्न करतो पण यश येत नाही मग त्याची मुलगी पुढे येते व शुक्राचार्यां...