ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.तो चक्क आंधळा होता.तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."आणि,,,,, ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली. तात्पर्य ....... डोळे आल्यावर स्वार्थ जागा जाला निरपेक्ष प्रेम हरल.
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......