*प्रिय मित्रा*, *फक्त तुझ्यासारख्या अनेक मित्रांसाठी हॉस्पिटल मध्ये जस हिम्मत करूनही बोलू शकलो नाही तसेच इथेही तुझं नाव लिहायची हिम्मत मला होत नाही कारण आता लक्षात आलय की यावर अंमल तूच नव्हे सगळ्यांनीच करायला हवा म्हणून,,* दोनच दिवसांपूर्वी एका मित्राच्या मुलाचा फोन आला की वडीलांना एडमिट केलंय त्यांना *पेरेलेलीस चा ऐटेक* आला आहे आहेत,, आता एडमिट आहेत म्हंटल्यावर त्याची भेटून विचारपूरस करणं आलं आणि तसा मित्र ही खूप जवळचा जुना मध्यंतरीच्या काळात कामाच्या धावपळीत तो विसरला होता मला,,, खूप मेहनती खूप काम करायची तयारी असलेला,,, हो येतो भेटायला अस म्हणत कुठलं हॉस्पिटल वैगेरे विचारून घेतलं,, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायला निघायच्या आधी चहा घ्यावा म्हणून सहज बसलो तो समोरच इसाप नितीच पुस्तक पडलं होतं सहज चाळायला घेतलं चहा येई पर्यंत एक गोष्ट वाचू म्हणत ते हातात घेतलं तो सहजच *माणूस आणि प्राणी* गोष्ट समोर आली,, एके ठिकाणी रस्त्यात एक साखरेचं पोत पडलेलं पाहून एक मुंगी धावत येते यथा शक्ती तिला उचलणं शक्य आहे तितका एक दाणा ती उचलते आणि चालू पडते मग तिच्या मागे चिमणी कावळा ससा कुत्रा...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......