# पूर्वी आमच्या शेजारी एक दिल्लीहुन आलेलं कुटुंब पूर्वी मुंबईत आलेलं राहत होत त्यात एक आज्जी तिची सून मुलगा दोन नातू एक नात रहात होती त्या आज्जीला आपल्या मुलाबाळांची छान नाव असताना देखील विचित्र नावाने हाक मारायची सवय होती मोठ्या नातीला लडकन, नातवाला लड्डू, दुसऱ्याला टेडया,,, आशा विचित्र नावाने हाक मारत असे न पटून एक दिवस हिम्मत करत त्या आजीला मी सहज विचारलं आजी इतकी छान छान नाव आपल्या नातवांची तुम्हीच ठेवली असतील ना??? तस आज्जीने मला जवळ घेतलं आणि केसांवरून हात फिरवत सांगितलं *बरोबर बोलतोस पण ज्याची जशी कर्म तस त्याच नाव* आता बघ ही सुनीता तू ओळखतोस तुझ्याच वर्गात आहे ना? तू बघतोस ही बसल्या बसल्या कुठेही लुडकते ( झोपते) आणि हा अनिलकुमार काही विचारले तर कधी सरळ बोलतच नाही नेहमी वाकडच ( टेढा) बोलतो, आणि हा अजय बघितलास ना किती खादाड आहे आणि लाडू बघितलं तर पंचपक्वांनाच ताट देखील बाजूला सारेल (लड्डू ) अरे जस नाव आहे तसेच वागावं नाही तर त्या नावाला अर्थ प्राप्त होतो कुुणी पप्पू तर कुुणी फेकू थांब आज खऱ्या #शेख_साहेबांची गोष्ट सांगते ऐक, तर हे शेख साहेब शाळेत कधी नीट जात नसत त...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......