ज्या महाभंगांना आपल्या बायकोचे ,मुलीचे, नातेवाईक स्त्रियांचे,किंवा ज्यां मुलींना सेल्फी काढत सतत व्हाट्सआप ,फेसबुक, इन्स्टाग्रामवर फोटो छोटे छोटे स्वतःचेच व्हिडीओ अपलोड करायची सवय आहे त्या सर्वांनी आवर्जून हा लेख वाचवा कालच्या लोकसत्तात चतुरंग पुरवणीत आलेला हा लेख,,, एका विकृत माणसाने एका स्त्रीचा नग्न व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल केला *दुर्दैव हे त्या स्त्रीचा चेहरा होता केरळ मधील शोभा साजु चा*,, त्या नन्तर या प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता या तीन मुलांच्या आईला सरळ टाकून दिले ती ओरडून ओरडून सांगत राहिली की हा व्हिडीओ माझा नाही पण तिचा आवाज ऐकणार कुणीच नव्हतं,,, एका व्हिडीओ मुळे कुणाचं कुटुंब, कुणाचं आयुष्य, कुणाचं घर उध्वस्त होतंय याचा जराही विचार न करता तो सहा मिनिटांचा व्हिडीओ अनेकांनी जराही विचार न करता फॉरवर्ड केला,, परंतु स्वाभिमानी शोभा या सगळ्यांच्या विरोधात ठाम उभी राहिली हा व्हिडीओ माझा नाही खुशाल शहानिशा करा अस सांगत थेट पोलिसांकडे तिने तक्रार केली, तिथून ती सायबर गुन्ह्या कडे गेली , तब्बल तीन वर्षांनी हा व्हिडीओ तिचा नाही हे सिद्ध झाले परंतु या तीन वर्षात ति...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......