Skip to main content

Posts

Showing posts from March 13, 2011

आई, असं का ग केलंस?...

(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र...) उरिया भाषेतील लेखक... श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक  हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं.  काय करावं ते सुचेना.त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून  ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं...... उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ?????????????????????????????????????????????? आई, असं का ग केलंस?????????? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का?  तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते;  पण तू मला मारूनच टाकलस. तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते.  आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं,  ते फक्त तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा,  तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस...