अर्थात नजरेचा फरक ,,,,,, एकदा एक अति श्रीमंत माणूस आपल्या मुलाला जवळच्याच एका खेड्यातल्या शेतावर गेला, तिथली ती गरिबी त्यालोकांच दारिद्र्य आपल्या मुलाने अनुभवाव म्हणून तो त्याला घेवून गेला , आणि मग त्याला आपल्या संपत्तीच महत्व आणि अपूर्वाई आपोआप कळेल .त्यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा सदैव अभिमान राहील असा विचार करून त्या खेड्यात त्या मुलाला तो घेवून आला होता. ते दोघ बाप लेक त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर दोन दिवस राहिले . आणि मग आपल्या गहरी परतल्यावर त्या बापाने आपल्या श्रीमंती गुर्मीत विचारले काय मग कशी वाटली ट्रीप? बघितलस ना गरीब लोक कस जगतात ? यावर तो मुलगा म्हणाला हो हि ट्रीप मला खूपच आवडली, आणि लक्षात आल कि आपणच त्यांच्या पेक्षा जास्त गरीब आहोत,,,,,, हे ऐकून बाप बेशुद्ध व्हायचा तेव्हडा बाकी होता,,, बाप म्हणाल ते कस काय? मुलगा म्हणाला आपल्याकडे एक कुत्रा आहे ,त्यांच्या कडे चार कुत्रे आहेत, आपल्या अंगणात पोहायचा छोटासा तलाव आहे त्यांच्या कडे खूप मोठी खाडी आहे , ती कुठे संपते ते दिसतच नाही, आपल अंगण गेट पर्यंत आहे त्याचं अंगण क्षितिजाला जावून टेकल आहे, आ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......