सध्या मी एक जाहिरात पाहतोय पीयर्स साबणाची त्यात ती आई आपल्या मुलीला शिकवतेय आंघोळ घालताना बाबरचा मुलगा हुमायु,हुमायुचा मुलगा अकबर ,,,,,,,,,,? आणि अचानक मला टोपी विक्याची गोष्ट आठवली ,,,, एक टोपी विक्या असतो , त्याच्या टोप्या माकड पळवतात मग रागाने तो डोक्यावरची टोपी खाली टाकतो आणि मग माकड हि टोप्या खाली टाकतात मग खुश होत त्या टोप्या उचलून घरी जातो वैगेरे वैगेरे ,,,,,आता त्यानंतरची गोष्ट ,,,,,, टोपी विक्या पार्ट २, कालांतराने त्या टोपी विक्याचा मुलगा मोठा होतो, आता टोपीचा व्यवसाय तो मुलगा करू लागतो बापाच्या मार्गदर्शनाखाली ,,,,,, तो रोज टोपी विकायला गावोगावी जात असे .कधी या गावी तर कधी त्या गावी बाप सांगेल तसा तो धंदा करत असे आणि एक दिवस त्याला त्याच जंगलातून जावे लागणार असते दुसर्या गावी टोपी विकायला ज्या जंगलात माकडांनी त्याच्या बापला त्रास दिलेला असतो,, हे समजल्यावर ईकडे बाप चिंतेत पडतो पण, सावरतो आणि सारा घटनाक्रम मुलाला सांगतो , आणि मग कस वागायचं ते हि सांगतो .त्याला बजावून सांगतो कि, बाबारे त्या जंगलातून जाताना सावध बरका!तिथे ती माकड आहेत ज्...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......