*||श्री गुरुवे नमः ||*
अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते
मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,,
तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,*
एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,,
निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,,
या शिष्याला त्यांनी भरभरून दिले
आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले
कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले
एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले
सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते
खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता,
आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते
त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती
आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता
खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं
सारेजण त्यांचा जयजयकार करत होते
आता वेळ होती तानसेन यांच्या सुरेल गायकीची तानसेन यांनी तंबोरा लावला आणि गायनाला सुरुवात केली आणि त्यादिवशी शिष्य गुरुवरचढ ठरला
तानसेन यांचं गायन गुरु पेक्षाही खूपच भारी झालं साऱ्या दारबाराने कौतुकाचा वर्षाव केला
अगदी त्यांच्या गुरु स्वामी यांनी त्यांची गायकी कौतुकास पात्र आहे म्हणत प्रांजळपणे खूप खुल्या दिलाने कौतुक केलं शाबासकी दिली,,
बादशहाने देखील कौतुक करत त्याला मोहरांचे *एक तबक* भरून बक्षीस दिले,,,
गुरु म्हणून स्वामी हरिदास यांचाही राजाने सत्कार केला आणि त्यांना
*दोन तबके मोहरा*बक्षीस देण्यात आल्या,,
हे पाहून तानसेन मात्र मनातून खट्टू झाला
*गुरु पेक्षा भारी गाऊन मला एकच तबक आणि गुरूला दोन तबक???*
अकबराला हि नाराजी लक्षात आली
त्याने बिरबलाला याचा खुलासा करायला सांगितले
खुलासा----
*बिरबल म्हणाले स्वामी हरिदास आणि तानसेन या दोघांचे हि गायन उत्तम झाले त्यामुळे त्या दोघांनाही एक एक तबक मोहरांनी भरलेलं देण्यात आलं मात्र ,,,,,*
*स्वामी हरिदासांना मोहरांचं एक तबक जास्त देण्यात आलं कारण त्यांनी तानसेन यांच्या सारखा उत्तम अद्वितीय शिष्य घडवला त्याबद्दल देण्यात आले आहे*
आणि तानसेनाच्या मनात गुरुपौर्णिमेच्या चंद्राचा लक्ख प्रकाश पडेल
तात्पर्य---
*गुरूने शिष्य घडवायचा असतो* *स्वतःची असलेली विद्या हि वाटायची असते ती स्वतः कडे ठेवायची नसते आणि तानसेन यांनी एकही शिष्य घडवला नाही ते स्वतः मोठे झाले परंतु त्यांनी परंपरा निर्माण केली नाही*
ता क---
*आज आम्ही देखील हिंदुहृद्यय सम्राट श्रीमान बाबासाहेब ठाकरे यांना मानतो कारण ते स्वतः आभाळा पेक्षाही मोठे होते आणि आम्हा लोकांना शिवसैनिकांना देखील शिवसैनिक हि सर्वोच पदवी देऊन त्या आभाळाला हि लाज वाटेल इतकं मोठं केलं आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
Comments
Post a Comment