काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,, आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर मिळाल सुतलीने बांधला हत्ती,,,, एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे , तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ, त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा महाराज आम्ही कंटाळलो. गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल. गुरुनी एक क्षण विचार केला आणि शिष्यांना म्हणाले सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा . त्याप्रमाणे सार्यांनी प्रयत्न करून त्या हत्तीला एका वृक्षाला बांधून ठेवले. हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला . पण हळूहळू तो शांत झाला . २\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता एका दोरखंडाने बांधा,, शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या दोरखंडाने ? अहो तो राहिल का त्यात ? मी सांगतो तस करा विश्वास ठेवा , पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,, तो दोर ही काढा आता साधी...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......