आंधी,,,,
काल मित्राने गाणं पाठवलं
*तुम आ गये हो नूर आ गया है*,,,,,, आणि झापटल्या सारखा सिनेमा डाऊनलोड केला आणि हरवून गेलो
सुचित्रा सेन आणि संजीव कुमार,,,, 💕💞💞👌
संजीवकुमार,,
त्याच्याकडे अमिताभची उंची धर्मेंद्रची शरीरयष्टी शम्मीचा धसमुसळेपणा राजेशखन्नाच मार्केटिंग काही काही नव्हतं
एक गोलमटोल हिरो खात्यापित्या घरचा,,,,, पण त्याच्याकडे होत ते अभिनयाच खणखणीत नाणं होत,,,, आणि स्वतः मी शम्मी राजेश खन्ना धर्मेंद्र अमिताभ यांचा फॅन असलो तरीही *शोले आजही पाहतो ते केवळ हात नसलेला संजीव कुमार डोळ्यातून आग ओकत गब्बरसिंग ला केवळ पायांनी चिरडून मारणारा म्हणूनच संजीव कुमारचा म्हणूनच धर्मेंद्र अमिताभ आणि गब्बर यांना पुरुन उरतो तो* असो,,,,
कथा तशी नेहमीचीच श्रीमंत बापाची स्वतःची तत्व जपत स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येऊ पाहणारी ती,,,
आणि आपल सरळ साधं कुठलेही छक्केपंजे नसलेल आयुष्य जगत आपली नोकरी आणि आपली कविता या पलीकडे कुठलीही अपेक्षा नसणारा तो,,,,
सिनेमा सुरू होतो
ती एक मोठ्ठी नेता झालेली असते आणि तो अजूनही एका हॉटेलचा मॅनेजर,,,,
तब्बल 9 वर्षांनी भेट होते
आणि मग,,,,,
*तो;-ये जो चांद है ना ईसे रात मे देखना ये दिन मे नही दीखता*
*ती;- हा ये तो रोज निकलता होगा*
*तो;- हा निकलता तो है लेकिन बिच अमावस आ जाती है वैसे तो अमावस 15 दिन की होती है लेकिन इस बार कुछ ज्यादा ही लंबी हो गयी,,,*
आपल्याला अस्वस्थ करत करत ,,, *तेरे बिना जिंदगी से कोई,,,* फ्लॅशबॅक सुरू होतो आणि आपण त्यात गुंतत जातो नकळत जसा भुंगा कमळात स्वतःला गुंतवून घेतो त्यातून बाहेर येऊ शकत असतो सहज पण ते बंधनच त्याला अडकवून ठेवत आपण ही गुंतत जातो या प्रेम कथेत
Comments
Post a Comment