एकदा ग्रीकचा आजारी पडला काही केलं उपाय पडेना मग सगळ्या वैद्यांच एक मत पडल कि महाराजांना जो आजार झाला आहे त्याच प्रकारचा रोगी शोधून जर त्याच्या पित्ताश्यातून जर औषध महाराजांना दिल तर नक्की फरक पडेल. पण पित्ताशायातून म्हणजे त्याला माराव लागेल राजाने न्यायधीशाला विचारून कायदेशीर सल्ला घेतला अर्थातच न्यायधीशाने राजाला खुश करण्यासाठी समती दिली. त्या करण्यास हरकत नाही असा सल्ला दिला त्याप्रमाणे राजाचे सैनिक तसा रोगी शोधण्यासाठी बाहेर पडले त्याप्रमाणे एका मुलाला पकडले हि कर्मधर्म संयोगाने तो गरीब होताच घरच्यांना पैशाची लालूच देवून मग त्याला ताब्यात घेण्यात आल . त्या मुलाला राजधानीत घेवून आले आता कसायाच्या हाती देवून त्याला मरणार तोच तो मुलगा आक्षाकडे पाहत जोरजोराने हसू लागला राजा आश्चर्यचकित झाला कि आता मुलाची खांडोळी होणार मरणाच्या दारात हा उभा आहे आणि हा हसतोय का? राजाने त्या कसायला थांबावयास सांगितले आणि त्या मुलाला विचाराले अरे आता तुला मारलं जाईल पाच मिनिटात तुझ शीर धडावेगळ केल जाईल , आणि तू हसतोस ? तेव्हा तो मुलगा म्हणाला ,,, ज्या मुलाचे प्राण वाचण्यासाठी आईवडिलांनी जीवच रान केल पाहि...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......