Skip to main content

Posts

Showing posts from May 24, 2020

शुक्राचार्य आणि मराठी माणूस,,,,

लायकी पात्रता असूनही डावलले गेलेले शुक्राचार्य दानवां च गुरुपद स्वीकारतात,, आणि दानवांची सरशी व्हावी म्हणून ते संजीवनी मंत्रविद्या मिळवण्यासाठी भगवान शंकराला शरण जातात भगवान शंकराचा भोळेपणा सारे देव जाणून असतात त्यामुळे देवलोकात एकच हलकल्लोळ माजतो,,, आपलं पद जाईल या भीतीने देवेंद्रही शंकराला शरण जातात पण भगवान शंकर भोळे असले तरी संजीवनी मंत्र काय त्याची ताकद काय त्याचा फायदा नुकसान काय या मंत्राचा गैरवापर देव लोकांना किती भारी पडू शकतो हे ते पक्के जाणून असतात,,, म्हणून ते अट घालतात,,,, *पुढील एक वर्ष झाडाला स्वतःला उलट टांगून घेऊन केवळ खाली पडलेल्या पानांचा धूर सेवन करायचा बाकी काहीही अन्न वा पाणी ग्रहण करायचं नाही केवळ त्यालाच हा संजीवनी मंत्र मिळेल,,,,* ही अट शुक्राचार्य स्वीकारतात,,, ही अट ऐकल्यावर अर्थातच देवेंद्र या अटी पासून पळ काढतात,, आणि ह्या ह्याला काय जमणार म्हणत शुक्राचऱ्याची टिंगल ही उडवतात,,, इकडे शुक्राचार्यांचं तपाच अनुष्ठान सुरू होत,,, *देवेंद्र नेहमी प्रमाणे हे तप सिद्धीस जाऊ नये म्हणून* *प्रयत्न करतो पण यश येत नाही मग त्याची मुलगी पुढे येते व शुक्राचार्यां...