पूर्वी एक शेजारी काका रहात होते त्यांना कुणीच नव्हतं त्यामुळे ते तसे आमच्या घरासोबतच जोडलेले होते माझा तर ते खूप लाड करत साधारण मी दहावीत असताना वारंवार पोट दुखत म्हणत डॉ कडे गेले डॉ ने अल्सर झालाय ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं मग माझ्याही त्यांच्या सोबत हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं डॉ साहेब बाहेर आले आणि म्हणाले की अल्सर तर नव्हता पण मुतखडा मोठा होईल अशी शंका आली थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं थोडी अधिक फी द्यावी लागेल आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,, हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......