बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही करायचं पण,,,, कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी , होणार्या बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा अल्पसा प्रयत्न,,,, आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,, ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,, जेवण करणारी आई लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला विसरतो आपण ,,नियमच,,, स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,, बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,, देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,, कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,, कौसल्येचा राम असेल हि पण,,, पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,, मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो तो बापच,,, नियमच,,, आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या बनियानवर ,,,नियमच,,, आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून मध्ये, तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,, आमच्या आजारपणात धावणारा बाप स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच ,,, आजाराला ना...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......