अर्थात सुखी आणि शांततामय सहजीवनासाठी ससा आणि कासव पार्ट २ ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहितच आहे . ससा आणि कासव मध्ये शर्यत लागते आणि ससा वनात गाजर, गवत आणि पाणी पिवून झोपतो आणि कासव मंद गतीने येते आणि पुढे निघून जाते . आणि शर्यत जिंकते ......... यातून बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही संथ का होईना पण ध्येयाच्या दिशेने चालत राहा यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,, १- खरतर येथे गोष्ट संपली पाहिजे कारण तात्पर्य तर समजल तरी दुर्दैवाने तसे होत नाही . या दोघांचे काही मित्र तर काही शत्रूही असतात . ते सशाला बाजूला घेतात आणि त्याचे कान भरतात आणि कुठेतरी सशालाही ते सलत असत कि साला कासव मला हरवतो? आणि त्या दोघांचे शत्रू नेमके त्याच्या या मनस्थितीचा फायदा घेतात. झाल ससा परत कासवा कडे येतो आणि परत त्याला शर्यत लावायचा आग्रह करतो. आणि यावेळी तो पूर्ण सावध राहतो , गृहपाठ पक्का करतो ठरवल्याप्रमाणे तो रानात कुठेही आराम करत नाही काहीही खात पीत नाही आणि शर्यत जिंकतो. येथेही बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही तर कठोर परिश्रमाला पर्याय...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......