Skip to main content

Posts

Showing posts from October 13, 2019

मेक्सिको महापौर ,*न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक* आणि आपण

मेक्सिको माफिया, मेक्सिको फूड,मेक्सिकोने पटकावले नोबेल पुरस्कारावर तर नावच कोरलेलं , याचा जसा आदर्श जनसामान्यांना असेल तर मला वाटत *न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक*  हा आदर्श देखील लोकांनी ठेवायला हवा,,,  तर झालंय अस की मेक्सिकोतील चिआपास हे सर्वात लहान गरीब पण प्राचीन *माया संस्कृती* चा वेध आणि शोध घेणाऱ्यांचे अतिशय आवडते राज्य  या *चिआपास मधील ही परवाची गोष्ट,,,,*  चिअसपास मधील सांतारिटा या गावातील सामान्य शेतकरी इतके संतापले की त्यांनी,, *आपल्या महापौराला त्याच्या कार्यालयातून खेचून काढले  त्याचे हसत पाय बांधून नन्तर ट्रकच्या दोरखंडाने जखडले आणि सरळ त्याचज धिंड काढली*  तो महापौर जॉर्ज लुईस हरणांडेझ याचा गुन्हा एकच होता तो म्हणजे,,,,*  *निवडून येण्याआधीपासून आणि सतत नन्तरही तो नागरिकांना सांगत असे की आता आपले सगळे रस्ते चांगले होणार बघा आता मी कसे सगळे रस्ते गुळगुळीत करतो ते*  त्याच्या या अच्छेदिनच्या वायद्यावर नागरीकांनी विश्वास ठेवला बरेच दिवस वाट पहिली,,,  परंतु हा महापौर म्हणजे नुसतेच *शब्द बापुडे केवळ वारा,,,* आहे *एक न...