आज कालच्या जीवन शैलीत मौज मजेत, मनसोक्त म्हणजे किमान एक दिवस उनाड जगायचे भाग्य आज काल खूप कमी जणांना,,, अगदी नाही म्हणल तरीही चालेल,,, मी ही त्याच टाईम मशीन मधला ,,, तसा मला सिनेमाचा खूप नाद पण मुंबईत जवळपास मी बघतच नाही पण पुण्याला गेलो की आवर्जून मग तो अगदी c ग्रेड असला तरीही पाहतो,,सुदैवाने खूप चांगले सिनेमा पहायला मिळतात असाच खूप दिवसांनी आज बघू उद्या बघू करत हातात स्मार्ट फोन असल्यामुळे *आपला माणूस* पहिला आणि बऱ्याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा ‘स्पर्श’ चित्रपट पाहिला होता. नकळत तो आठवला,,, सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.अंधशाळेच्या प्रिन्सिपॉल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचे सुंदर मिश्रण होतं.नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम. शबाना आजमी प्रिन्सिपल सोबत आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा ‘स्पर्श’ हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे. हे सगळं आठवायला एक कारण घडलं. काल-परवा ‘आपलं माणूस’ हा सिनेमा पाहिला. अप्रतिम नाना ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......