जुन्या काळी इस्लामी लोक वस्ती असलेल्या एका गावात हि कथा घडली . त्या गावात इक अतिशय बदमाश सदासर्वदा गावातील लोकांचा छळ करणारा दुष्ट गुंड होता . गावातील एकाही व्यक्तीच्या मनात त्याच्या तिळमात्र चांगली भावना नव्हती . सर्व जण त्याचा तिरस्कारच करीत !! अश्या या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या गुंडा चा मृत्यू समय जवळ आला . मेल्यानंतर आपल्या बदल कुणीही चांगले उदगार काढणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले त्या विचाराने आयुष्यात तो प्रथमच दुखी झाला मृत्यू समयी त्याने आपल्या मुलास जवळ बोलाविले, आपली अंतिम इच्छा सांगताना तो दुष्ट मनुष्य म्हणाला , '' मी आयुष्यात कधीयी कोणाचे भले लेले नाही .नेहमी सर्वाना त्रास दिला. त्या मुळे लोक सदा माझी निंदा च करतील ........ तेव्हा माझ्या मृत्यू नंतर तू असे काही काम कर की,लोक मला चांगले म्हणतील .'' बापाचा दफनविधी करून आल्या नंतर मुलगा विचार करू लागला . मी कोणते काम केल्याने माझ्या बापाला लोक चांगले म्हणतील ? पण काही उपाय सुचेना . दोन दिवसांनी गावात आणखी एका इसमाचा मृत्यू झाला . त्याचा दफनविधी करण्याकरता इतर सोबत हा मुलगाही गेला . परतताना त्याला एक अफल...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......