Skip to main content

Posts

Showing posts from September 2, 2018

आई एक शिक्षिका

"चला हवा येऊ द्या"  या कार्यक्रमात सिने कलाकार श्री जॅकी श्राॅफ यांनी स्वतः बद्दलचा "मन" हेलावुन टाकणारा अनुभव सांगितला, कार्यक्रम पाहणा-यांनी ऐकला असेलचं परंतु ज्यांनी नाही ऐकला त्यांच्या करिता ......, "जॅकी श्राॅफ" यांच्या शब्दात .... मी, चित्रपटात येण्यापुर्वी वाळकेश्वर येथे चाळीत रहात असे,  तेव्हा मी, माझा भाऊ व आई वडील एका खोलीत रहात असुं ,रात्री झोपेत कधी मला खोकला आला तरं आई उठुन बसतं असे, आई खोकली तर मी उठुन बसे . चित्रपटात काम मिळाल्यावर पैसा आला, श्रीमंती आली, खोलीचा फ्लॅट झाला,  खोल्या वाढल्या, भिंती मधोमध आल्या, एकाच फ्लॅट मध्ये त्या पलिकडच्या भिंती आड झोपलेली "आई"  ह्रदयविकाराने गेली...............आणि, या भिंती कडील मला कळले देखिल नाही .... सांगा मी काय कमावले..... ....... काय गमावले . 🙏The Great Jacky Shrof🙏