एका विनोदाची सत्यकथा लग्नाळू मुला मुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट जरूर वाचावी,,, काल रात्री व्हाट्सएप वर विनोद आला,, की जीव द्यायच्या निमित्ताने 20 व्या मजल्यावरून एक मुलगी उडी मारते,, तिच्या नशिबाने 17 व्या मजल्यावर एक मुलगा उभा असतो , तो तिला अलगद झेलतो आणि त्या सुंदर अशा मुलीला पाहून विचारतो प्रिये माझ्याशी लग्न करशील? ती त्याला *हट स्टूपिड* बोलते अर्थातच तो मुलगा तिचा हात सोडून देतो परन्तु नशिबाने पुन्हा खाली 14 व्या मजल्यावरचा उभा असलेला मुलगा तिला वाचवतो त्या सौंदर्यवतीला पाहून तो देखील विचारतो प्रिये माझ्याशी लग्न करशील? पुन्हा ती त्या दुसऱ्या मुलाची *ए बेअक्कल* अशी त्याची संभावना करते अर्थातच तो ही मुलगा हात सोडून देतो,, परन्तु नशीब जोरावर असलेल्या त्या मुलाला वाचवायला एक मुलगा कर्मधर्म संयोगाने आठव्या मजल्यावर उभा असतो आणि त्याने तिला वाचवल्या बरोबर हो हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे म्हणत गळ्याला त्याच्या मिठी मारते,,, परन्तु इथे मात्र तीच नशीब खराब असत ती अस बोलल्या बरोबर तो वाचणारा मुलगा , मनात विचार करतो कुठे हिला वाचवतो आहे तर ही ब...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......