*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"* सकाळीच श्री कबिरांचा दोहा वाचनात आला,,,,, आणि सरकार स्थापून सुरू ही झालय तरीही हातातून गेलेली सत्ता समोरच्याला बोचतच राहते आणि माझ्या सारखा समोर आला की आपसूकच त्यांचे #मगरीचे_अश्रू बाहेर येतात पण माझ्या समोर मात्रा चालत नाही तरीही आपलं मत मांडायचं म्हणून मग,,,,, अत्यंत साळसूद पणाचा आव आणत समोरचा विचारतो ,,,, नाही पण ते कुठे 53 कुठे 105 थोडा तरी ताळमेळ ,,नाही म्हणजे तुम्हला तरी पटत का,? अस म्हणत आपल्याला शब्दात फसवायचा अडकवायचा केविलवाणा प्रयत्न करतात मी तो ही उडवून लावतो,,, पण सकाळीच कबिरांचा हा दोहा वाचनात आला,,,,, *" दात दम देतात;-हम बत्तीस तू अकेली, जरासी कतर खाऊ, चाबाऊ तो फिर्याद कहा ले जाये जीभ उत्तरते;-एक बात टेडी बोलू तो अरे बत्तीस निकल जाये"* हा कबिरांचा दोहा बरच काही सांगून जातो मुळात कबिरांचा जन्मच मला वाटत चुकलेल्या लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी झाला असावा,,, *"जीभेंला जेव्हा 32 दात दरडावतात की तू एकटी आहेस आम्ही बत्तीस आहोत जास्त नाटक करशील ना तर खैर नाही तुझी हा हे लक्षात ठेव दुसऱ्याच क्षणी दणकन तुकडाच...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......