एका ईमेल मधून आलेली ही सुंदर महाभारत कथा सर्वाबरोबर वाटून घ्यावी म्हणून देत आहे. यातून खूप चांगले विचार चांगली शिकवण मिळते. बोधपर आणि वैचारिक असल्याने आस्वाद सदरातून देतो आहे. लेखक (किमान मला तरी) अज्ञात आहे. कोणाला माहिती असेन तर सांगावे ही विनंती. महाभारत कथा महर्षी व्यासांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार असणारे महाभारत, आपल्याला अजूनही अनेक गोष्टी सांगत, शिकवत असते. महाभारतातील युद्धकांड तेवढेच प्रसिद्ध आहे. जवळपास ४० लाख योद्ध्यांचा समावेश असलेले हे युद्ध मानवी भावभावनांचे अनेक कंगोरे स्पष्ट करते. या युद्धाचा अभ्यास केला असता, त्यातून आजच्या व्यवस्थापनाचे अनेक नियम दिसतात. एका वाचकाने "प्रेरणा' पुरवणीसाठी आवर्जून ई-मेलने हा मजकूर पाठविला. भारतीय युद्ध आणि व्यवस्थापन यांचा संबंध यातून स्पष्ट होतो. ....... ---------------------------------------------------------------------------- पार्श्वभूमी भारतीय युद्धामध्ये मनुष्यबळ आणि योद्ध्यांचा विचार केला, तर कौरवांचे पारडे जड दिसते. कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी, तर पांडवांचे सात अक्षौहिणी होते. (एक अक्षौहिणी = २१,८७० र...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......