काल सहजच थोडा सक्काळी निवांत चहा पीत बसलो होतो नातवाने कार्टून लावलं होत ते पहात होतो एक लहान मुलं आईला विचारत होत मा क्या भगवान से डरणा चाहीये,,,आई, नही बेटा अपने गलीतीयोसे सिखोगे तो भगवान से डरने की कोई आवश्यकता नही,, *अगर निडर बनाना है तो गलतीयोसे डरणा भगवान तो तुम्हरा भला ही चाहते है*,,,,, तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,, आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,, (उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,, मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,, कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस?...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......