कारण सीतेकडून घेतलेले वचन,,,,, श्रीराम कस्तुरी मृगा मागे गेल्या नन्तर मायावी मारीच रामाच्या आवाजात लक्ष्मणा धाव सीते सीते असे आवाज देतो तेव्हा सीता लक्ष्मणाला खूप आग्रह करत अगदी कामातुर ठरवत रामाला शोधायला पाठवते,,, शेवटी लक्ष्मण लक्ष्मण रेषा आखतो आणि सीते कडून वचन घेतो की काहीही झालं तरी ही लक्ष्मण रेषा ओलांडून तू पलीकडे जाणार नाही आणि ही ओलांडून गेलीस आणि न जाणो तुझं बर वाईट झालं तर जबाबदार मी असणार नाही,,,,,, लक्षात घ्या आपण सारे हे रामायण घडलं त्याला कधी दशरथ, कैकयी, मंथरा, रावण विभीषण ह्या साऱ्यांना दोषी मानतो पण आज पर्यन्त कुणीही लक्ष्मणाला दोषी मानलं नाही,,,, कारण सीतेकडून घेतलेले वचन,,, उलट हनुमंताची लंकेत भेट झाल्यावर रामाला खुण पटावी म्हणून चुडामनी देत असताना तिने हनुमंता कडे लक्ष्मणाची माफी ही मागितली लक्षात घ्या हे कुठे ही लिखित वचन नव्हतं #न_की_जाहीर_मीडिया_समोर_दिलेली_कबुली तरीही सीतेने कबुलीनामा हनुमंता कडे पाठवला आणि माझी चूक झाली मी लक्ष्मणाच ऐकलं नाही अशी कबुली दिली ज्या बद्दल ना रामाला माहिती होती न की हनुमंताला*,, प्राण जाये पर वचन ना जाये हे शिकवत...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......