कारगीलच्या युद्धात शहिद झालेल्यांच्या घरीही आज दीपावली साजरी होत असेल. आणि का नाही... त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे. पण,,,, कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक, तर,,, पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल, हाच काय तो एक फरक , त्यांच्या आणि आपल्या घरातला. नसेल आज सोबत त्यांचा मुलगा... जो दरवर्षी मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा. पण म्हणून काय झाले! त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत, वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला. त्यांना अभिमान असेल की, आज संपूर्ण हिंदुस्थानात जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे. याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे. आणि ती म्हणजे त्यांच्या शूरवीर मुलाने, आपल्या देशाच्या रक्षणांसाठी, शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती ! हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस हि दीपावली साजरी करण्यास. ठाऊक आहे मला लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं. ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत. म्हणूनच...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......