कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये
त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा
आशेवर,,,,,
काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,,
एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,,
ते दोघे रोज नदीवर भेटत,,
दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,,
मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे
माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो
थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो
खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,,
हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक,
उठता बसता लाथा घालतो
वेळेवर जेवायला देत नाही
अंथरून पांघरून सोड
आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,,
अस ते गाढव रोजच तक्रार करत असे,,,,
हे ऐकून ते धष्टपुष्ट गाढव त्याला प्रेमाने आग्रहाने सांगत असे अरे सोड त्या मालकाची नोकरी आणि ये माझ्या सोबत,,,
पण ते गाढव काही ऐकत नसे
रोज मर खात उपाशी पोटी राहत असे पण मालकाला सोडायची गोष्ट आली की गप्प रहात असे
एक दिवस खूपच खोदून खोदून विचारल्यावर ते मरतुकड गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणलं,,,,
अरे माझा मालक जरी मला उपाशी ठेवत असला रोज रट्टे घालत असला तरी,,,,,,
तो जेव्हा (रोजच) दारू पिऊन येतो तेव्हा तो त्याच्या सुंदर रूपवती बायकोला मारतो आणि नशेत रागाच्या भरात तो रोज बोलत असतो
नीट वागली नाहीस तर मी गाढवाच्या गळ्यात बांधीन तुझं त्याच्याशी लग्न लावून देईन,,,,
आणि मित्रा मी या आशेवर आहे एक ना एक दिवस तो मालक त्याच्या सुंदर रूपवती बायकोशी माझं लग्न लावून देईन,,,,,
जय चिंधुराष्ट्र
तात्पर्य:- आज देखील अनेक गाढव याच आशेवर आहेत एक ना एक दिवस या देशात चिंधुराष्ट्र चा उगवता सूर्य आपल्याला याची देही याची डोळा पहावयास मिळेल
Comments
Post a Comment