का कुणास ठावूक पण पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,, घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग "मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला.वडील,आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं. अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला लष्करात मिळत होते,, पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो, "देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?" पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......