*आपले दात आणि आपले नातेवाईक*,,,,, काल एक मित्र अचानक भेटला भर थंडीत ही त्याला घाम आला होता बसला होता एक बाजूला सोसायटीच्या आवारात मला बघताच एक उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करू लागला,, तस त्याला मी विचारलं तर खुणेनेच बोलला हा बघ दात पडला ,,,मला खर तर हसू येत होतं पण काळजीने विचारलं की कारे कुठे पडलास की काय? की केलीस मारामारी तो- पुन्हा खुणेनेच नाही म्हणाला मी-मग हलत होता का? नीट रोज दोन वेळा दात साफ ब्रश करत नाही का? तो- सध्या हलत होता पण मी दात दोनदा काही घासत नाही जमत नाही उशिरा येतो मग जेवतो आणि लगेच झोपतो,,, सकाळी मात्र घासतो रोज *मी- अरे हलत होता तर डॉ कडे का नाही गेलास? आणि आता 45 वर्षाचा आहेस आता दात गेला तर येत नाही रे काळीजी घ्यावी कस आहे आपल्या जन्मासोबत नाक कान घसा जीभ सगळं आपोआप येत दात हे नंतर येतात आपल्या तोंडात जे जे काही पडेल त्याच योग्य चर्वण करून ते आपल्या मदतीसाठी आयुष्यभर स्वतःची झीज करवून घेत असतात ते ही गप्प बसून सोसत असतात आपल्यासाठी तात्पर्य:- *आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मग ते दात असो नातेसंबन्ध,मित्र, सगेसोयरे यांची काळ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......