गुरुजींच्या संपर्कात आलो आणि मग गुरुजींनी सांगितलेल्या वाटेवर बिनबोभाट चालायचं इतकंच माहिती त्यांच्या सांगितलेल्या गेलेल्या शिकवणुकीत बलिदान मास देखील येतो आणि मी तो कसोशीने पाळतो,,,काल पासून अनेकांनी मुंडन केलेले फोटो fb वर टाकलेत, कुणी गोड वर्ज्य ,,यर कुणी अनवाणी महिनाभर,,कुणी कुणी आपण कसा बलिदान मास करणार वैगेरे वैगेरे टाकलं आहे. आता दोन गोष्टी आहेत,,,, साधारण 3/4 वर्षापूर्वी एका परिचित आमच्या जोशी बाईकडे गेलो होतो कामा निमित्त,, गप्पा टप्पा चालल्या होत्या बाई म्हणाल्या बस चहा ठेवते मी म्हंटल नको नको मी चहा घेत नाही बर मग कालच गावाहून कडकडे (लाडू) मी त्याला ही नकोच म्हंटल , सध्या गोड खात नाही मी मी अत्यन्त गोडघाशा हे माहीत असल्या मुळे आश्चर्याने त्यांनी विचारलं का रे काय झालं??? मग मी सांगितलं की आमचा बलिदान मास चालू आहे ना मग मी एकच वेळ जेवतो आणि काहीही गोड खात नाही,, मग ते का कशासाठी कुणासाठी कुणीसांगितलं वैगेरे वैगेरे सांगितलं आधी वाटलं की हे ऐकून त्यांना बर वाटेल पण त्या रागावल्या छे छे असलं काही करून काही उपयोग आहे का ? उगाच नको ते उद्योग अरे दिवसभर तुझं एक तर...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......