* #मुळशी_पॅटर्न * पाहिला आणि प्रचंड अस्वस्थ झालो प्रवीण तरडे ची अप्रतिम कलाकृती आहे .... ही गोष्ट एका जिल्ह्याची नव्हे तर,,, ही गोष्ट आहे बेसुमार वाढलेल्या तुमच्या आमच्या * #हव्यासाची * आहे,,, ही गोष्ट आहे आपल्यामुळेच जन्माला आलेल्या * #बकासुरची * ,,, ही गोष्ट आहे * #विकासाचा_भसम्या * झालेल्या सर्वांची,,, ही गोष्ट आहे केवळ तुमचा आमच्या हव्यासापाई * #वाट्टेल_त्या_थराला * जाणाऱ्या लोकांची,,,, हे असे लोक आहेत ज्यांची वाट चुकवली गेलेली आहे खर तर सगळ्याच सिनेमात चांगल्याचा वाईटावर विजय अशीच गोष्ट असते इथे ती नेमकी नाही इथे ती कायम राहते #*प्लास्टिक* च्या रुपात ,, कारण या जगाचा अंत जरी उद्या झाला तरी #*प्लस्टिक मात्र* उरणारच आहे हे प्लस्टिक म्हणजे नेमकं काय ते सिनेमा पाहिल्याशिवाय कळणार नाही परंतु ते प्लस्टिक समूळ नष्ट होऊ शकत त्यासाठी आपणच आपला विकासाचा हव्यास सोडून दिला पाहिजे आणि केवळ आपल्या हव्यासा पायी केवळ मला पगार जास्त माझी कमाई जास्त मग दारात एक गाडी तर दुसरी का नको आमच्या हव्यासाला काही मर्यादा राहिल्या नाहीत आणि त्याचाच फायदा घेत बिल्डर ,राजकारणी, आणि...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......