जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी. दोन लहान मुलांची आई. कुणाची तरी लेक. कुणाची तरी बहिण, कुणाची तरी भावजय. आणि आता, देशासाठी लढण्याचा निर्धार केलेली भारतीय सैन्याची एक शूर अधिकारी. कर्नल संतोष महाडिक देशासाठी लढता लढता हुतात्मा झाले, तेव्हा स्वाती दुःखावेगाने चिरडून जरूर गेल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात पेटून उठले होते अंगारे. जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा लाजाहोमाच्या अग्नीला साक्षी ठेऊन त्यांनी पतीला वाचन दिलं होतं की सदैव बरोबर वाटचाल करेन. गेल्या वर्षी पतीच्या चितेच्या अग्नीला साक्षी ठेऊन, डोळ्यातले अश्रू पुसून त्यांनी संतोषना मनोमन दुसरं वचन दिलं, 'तुमचे राहिलेले काम मी पुरे करेन. तुमच्या जागी मी आर्मीत जाईन. देशासाठी लढेन.' ते स्वप्न पुरं करणं सोपं नक्कीच नव्हतं. सैन्य भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. त्यात त्यांचं वय त्यांच्या विरुद्ध होतं. सैन्यात अधिकारी म्हणून जॉईन होण्यासाठी जी कमाल वयोमर्यादा असते ती स्वाती महाडिक कधीच ओलांडून गेल्या होत्या, पण संरक्षणमंत्री श्री मनोहर पर...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......