हि अशी अंधेर नगरी जिथे भाजी आणि खाजा एकाच तागडीत तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही तर मित्रांनो ,,, आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे प्राचीन काळी एकदा एक प्रवासी या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला आता याच्या कडेच चौकशी करावी, या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,, या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ? ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,, प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे? ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ? ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......