माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते. जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......