एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली आपण कसे आहोत हे कळण्यासाठी सतत स्वतः कडे लक्ष असणे खूप गरजेचे असते मग इतरांनी ते कितीही सांगितलं कि तुम्ही कसे आहात तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमची चाल ठरवता येते आणि मग "अरे गेलो असतो तर बरे झाले असते "असे वाटणे. आणि चालल्यावर "अरे थांबलो असतो तर ?" "उगाचच बोललो " असे वाटणे बंद होते कारण तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता दुसरा त्याचा काहीही अर्थ काढो,,,कारण "जे आहे ते आहे जे नाही ते नाही " अस वैराग्य एकदा प्राप्त झाल कि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा डामडौल पाहून चळत नाही वळत नाही एका गुरुची आणि राजाची ही अशीच गोष्ट ,,, त्या राजाला वारंवार वाटे कि आपल्या गुरूने देखील आपल्या सारखच आपल्या राजवाडयात राहव ,,,काय आहे त्या जंगलात ? दरवेळेस राजा आमंत्रण देई ,राजाने दरवेळेस आमंत्रण द्यावे "चला साहेब राजवाड्यात" आणि गुरूने बोलावे,"नकोरे बाबा मी ईथेच बरा आहे " गुरु बोले "ईथे काय आणि तिथे काय "सारखच तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान ,,,, परंतु राजाला वाटे कि गुरु खोट बोलतोय कदाचित...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......