Skip to main content

Posts

Showing posts from July 14, 2019

संतुर्की-- संत्या आणि सुरकीची गोष्ट

*संतुर्की* संत्या आणि सुरकीची गोष्ट,, मराठीतील वेब सिनेमा,, खूपच छान सिनेमा,,, कुठे ही जाती व्यवस्थेवर दगड फिरकवला जात नाही,, खूप मोठा डायरेक्टर नाही,, परदेशी लोकेशन नाही,, प्रसिद्ध गीतकार सोबत नाहीत,, गरीब श्रीमंत असा रोजचा घीसापिटा फॉर्म्युला नाही,, 20 वर्षांपूर्वीचा बापाच्या खुनाचा बदला वैगेरे,, भूत भुताटकी, देव देवतांवर टीका,,, हिंदू धर्मावर टीका,, अस्स काहीही नाही,,, उंच पुरा तगडा हिरो 2 पीस मधील हिरोईन महागड्या गाड्या त्यांची तोडफोड जुडो कराटे येणारा सर्वगुणसंपन्न हिरो मटेरियल नाही दारू सिगरेट मोबाईल यांची रेलचेल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* मोठी शाळा कॉलेजेस नाहीत भारी गुळगुळीत रस्ते नाहीत आणि *आयटम सॉंग* तर बिलकुल नाही *आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो* सहज साधं निर्मळ प्रेम कुठेही त्याचा अतिरेक नाही तू माझी नाही तर कुणाचीही होणार नाही ही भूमिका नाही आजच्या पिढीच नेतृत्व कबीर सिंग प्रेमभंगात दारुडा हिंसक होतो आणि लोकांना तो आवडतो ही😏 त्या कबीर सिंग वाल्यांनी तर हा सिनेमा तर आवर्जून पहावा अरे प्रेमाचा पाया त्...