Skip to main content

Posts

Showing posts from April 28, 2013

एका रात्रीची गोष्ट अर्थात ,,,

आजचा दिवस माझा सर्वांग सुंदर असा मराठी चित्रपट पाहण्यात आला आणि नेमका १ मे महाराष्ट्र दिनाच्या आसपास चित्रपट यावा आणि जमल्यास सचिन खेडेकरांनी सदर केलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा खरतर हीच सदिच्छा व्यक्त करायला हवी ईतक्या उच्च दर्जाचा अभिनय आणि चित्रपटच सादरीकरण झाल आहे कथा ,, चित्रपट सुरु होतो तोचमुळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची कधीही पडण्याची शक्यता आहे विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत ,सारेच गुढघ्याला बाशिंग बांधून बस आता हा जाणार आणि मीच मुख्यमंत्री होणार या दिवा स्वप्नात रमलेले आणि ,,, साऱ्यांचे डाव उधळत,साऱ्या विरोधकांची विकेट घेत ,साऱ्या बातमीदारांना ,टीव्ही वाल्यांना उघडे पडत आपल मुख्यमंत्रीपद तर सचिन राखतातच वर महाराष्ट्रासाठी विशेष प्याकेज हि घेवून येतात ,,,, चित्रपट सुरु होतो एका हुशार ,बुद्धीमान माणूस आपल्यासमोर येतो साऱ्या विरोधकांना तोडीसतोड असा जबाब देणारा मुख्यमंत्री आपल्या विरोधकांना त्यांची योग्य ती जागा दाखवणारा ,, वेळात वेळ काढून एका लग्न समारंभात येतो आणि ,,, सारेच प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योगपती ,मोठ मोठे अधिकारी आलेले असतात लग्न घरातील मंडळ...