एक दिवस नेहमी प्रमाणे अकबरला बिरबलची खोडी काढावीशी वाटली आणि त्याने तो म्हणाला,,, तुमचा देव आणि आमचा खुदा यात खूप फरक आहे ,, आमचा देव बघ कसा राजेशाही आहे तो स्वतः येत नाही असा नोकरा सारखा शेपूट हलवत तो त्याचा दूत पैगंबर साहेब पाठवतो,, तुझ्या देवाला काहीच काम धंदा आहे कि नाही? बिरबल - तस नाही सरकार आमचा देवच खरा मी ते सिध्द करून दाखवतो , थोडे दिवसांची मोहलत द्या ? यात चार पाच दिवस निघून गेले , आणि बिरबलाने यमुना नदीत नौका वीहारच आयोजन केल अकबर आणि तो नौका विहारासाठी गेले आजू बाजूला संरक्षणार्थ आधीच काही नौका नदीत तैनात केल्या होत्या , कालीयाला पोटात घेणारी ती नदी, बिरबलने एक युक्ती केली ज्या नावेत अकबर बसणार होता त्याच नावेत एका दासीला तिच्या नवजात बालका सह बसवलं होत अर्थातच ती दासी आणि आणि तीच ते मुल खोट होत , तिच्या हातात ते लहान मुल म्हणजे मेणाचा लहान पुतळा होता दिसायला मात्र तो अक्ब्राचाच मुलगा आहे कि काय अस दिसत होत ,, दासीला सार काही आधीच शिकवून ठेवल होत , आणि अशा तर्हेने सारे नौका विहाराल...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......