सध्या महाभारत आणि लॉक डाऊन सुरू आहे,,, महाभारत युद्धात अभिमन्यू चक्रव्यूह भेदताना दिसणार आहे,, हे सगळं आठवायचं कारण आमच्या घरातलं *जुन घड्याळ,,,* मी साधारण 11 वीत होतो त्यावेळी ते घड्याळ थोडं बिघडलं होत किती ही चावी दिली काटे उलट सुलट फिरवलं तरी ते कधी मागे कधी पुढे पळत असे योग्य वेळच दाखवत नसत एक दोन जणांना ते दाखवलं पण त्यांनी सांगितलं आम्ही बनवत नाही ,,, एक दिवस मात्र घरात कुणी नाही हे बघत माझ्यातला मॅकेनिक जागा झाला ,,म्हंटल बघू तरी काय ते खोलून,,, पण ते खोल्ल मात्र नेमका काय बिघाड तो लक्षात येईना,, शेवटी नाद सोडला ,, पण खरी अडचण तर पुढे होती ,, ते घड्याळ उघडायला तर उघडलं पण आता ते पुन्हा फिटिंग करणं अवघड होतं त्यात बापाचे फटके बसणार ते वेगळंच होत,,,, घाबरत घाबरत मी ते कसबस फिट करत होत तस भिंतीवर लटकवल,, थोड्या वेळाने वडील आले त्यांनी ते घड्याळ एका चांगल्या हुशार घड्याळवाल्याकडे नेलं त्याला सांगितलं की चालताय पण सारख पुढे मागे होतय,, अर्थातच ते घड्याळ त्याने उघडलं आणि वडिलांना सांगितलं अहो तुम्ही म्हणताय की घड्याळ चालू आहे पुढे मागे होतंय,, वडील म्हणाले हो,, त्या...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......