Skip to main content

Posts

Showing posts from April 15, 2018

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे*

*हंस ,माणूस ,आज्जी आणि बगळे* पूर्वी आजच्या सारखी परिस्थिती नव्हती सागर नद्या, आकाश त्याचप्रमाणे माणसाच्या मनाचा तळ स्वच्छ दिसत असे त्यामुळे तेव्हा tv मोबाईल इंटरनेट च जाळ नसल्यामुळे मुलांना खेळ लगोरी कबड्डी पतंग सूर पारंब्या असे मैदानी खेळ खेळले जात आकाश निरभ्र असल्या मुळे रात्री हमखास आम्ही शहरात असल्यामुळे गच्चीवर झोपत असू मग आपसूकच टक्क उघड्या डोळ्यांनी जितकं आभाळ डोळ्यात सामावून घेता येईल तितकं सामावून घेत झोपी जात असू पण या दरम्यान बरेचदा संध्याकाळी घरी हंस पक्षांचा थवा उडत जाताना दिसे,,, मी बरेचदा टक लावून पहात बसत असे ते इंग्रजी *V* आकारात उडत असत मला नेहमी असा प्रश्न पडे की हे असेच का उडतात? मागच्याला पुढे जावस वाटत नाही का? की पुढचा मागच्याना उडुच देत नाही? बर ते मान्य केलं तरी मग मधले काय करतात? ते का जोर लावून पुढच्याला ढकलत किंवा बाजूला होत स्वतः उडत??? आता *त्यावेळी आमचा गुगल म्हणजे आमची आजी* तिच्याशिवाय कोण उत्तर देणार??? मग आजी उत्तर देत असे अरे बाळा तू शाळेत जातोस की नाही ते तुझ्या पुस्तकात विमान पाहिलस की नाही? ते असच इंग्रजी *V* आकारासारखं असत मानवाला निसर्...