डॉ. रोहिणी वळसे पाटील यांची 'मास्तर' नावाची कविता अतिशय सुंदर आहे जी सद्यस्थितीवर प्रकाश टाकते. म्हणून शेअर करावीशी वाटली. . *'मास्तर'* मास्तर दमला असाल तुम्ही शतकामागून शतकं चालतचं राहिलात तुम्ही ... तुमच्या पायातील वेदना भेगाळून तिचं आता खिंडार झालयं तुम्ही पार केल्यात असंख्य अडाणी वाटा अन् अज्ञानात पेरीत आलात ज्ञानाच्या असंख्य लाटा... तुम्ही मार्क्स शिकविला तुम्ही ज्ञानोबा शिकविला तुकाराम, ज्योतीबा आणि सान्यांचा शामही मास्तर तुम्ही शिकविलात ज्योतिबाची ज्योत सावित्रीच्या हातात देऊन असंख्य अबलांना सबलतेचा मार्ग शिकविला पण मास्तर ..... काळाच्या ओघात तुम्ही दिसेनासे झालात तुमच्या काळ्या कोटासहीत...... मास्तर दुनिया बघा कुठे चाललीये मार्क्सवाद उलटा टांगून रंगीरंगीबेरंगी माॅल सजलेत अंधाराला सजवत..... मनावरची धूळ काढणारी शामची आई आता रस्त्यावरचया धुळीलाही घाबरत नाही. ... मास्तर आईची भाकरी चूलीतच राहिली हो... बर...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......