Skip to main content

Posts

Showing posts from August 19, 2018

Ztv उंच माझा झोका ग,

एका ओळखिच्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ति कड़े एक आई आपल्या मुलाला घेवुन जाते आणि सांगते या माझ्या मुलाला जरा संमजवा हां खुप गुळ खातो त्यावर तो म्हणतो आज ज़रा कामात आहे आठ दिवसानी या आठ दिवसांनी ती बाई पुन्हा जाते तेव्हा तो एव्ह्ड च म्हणतो बेटा गुळ खावु नको आता मात्र बाई चीडते अरे हे त्या दिवशीच सांगायच आठ दिवस का लावले त्यावर तो म्हणतो आधी मी गुळ खाण बंद केल मग मी आज तुम्हाला सांगीतल झी टीवी ने काल हेच केल काल संध्याकाळी झी टीवी वर *उंच माझा झोका* कार्यक्रम होता अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता . सर्वच कलाकार जे पारितोषक देण्यासाठी आले होते ते सारेच आलेल्या माता भगिनींच कार्य कर्तुत्व पाहून भारावून गेले होते ते सारेच हे मान्य करत होते की आलेल्या माता भगिनींचा सत्कार आम्हाला करायला मिळतय हेच खर आमच भाग्य आहे  या माता भगिनींचा सत्कार करून आम्ही उपकृत झालो आहोत पण त्यात ही नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया जबर्दस्त होती नाना म्हणाला, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी बोलवन्यात येत तेव्हा उगाचच आपल्या मनात एक *अहंगंड* तयार झालेला असतो की मी कुणी तरी आहे ...

दुर्दैव हे सांगावं लागत,,,,* आपले सणवार आले की

*दुर्दैव हे सांगावं लागत,,,,* आपले सणवार आले की आपलेच निलाजरे आपल्याच सणावाराची टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानतो काल परवा पासून सिनेमातील हिरोईन राखी तिला खांबाला बांधली आहे असा फोटो पाठवत आहेत वर त्यावर लिहितात *राखी बांधनेका सही तरीका* त्या सर्व शहाण्यांना सांगावस वाटत कि राखीला अशा तर्हेने खांबाला त्या खलनायकाचा राखिशी कस वागायचा इरादा असतो?? *तुम्हला काय वाटत तुमच्या बहिणीशी कुणी अस वागावं का??* बर इतकी लाज वाटते आपल्या बहिणीची तर फ्रेंडशिप डे ला बरे कुणाकडूनही त्या दोऱ्या बांधून घेता?? *हे कसलं प्रेम??* अरे बाबांनो रस्त्यावर कोण भेटत?? आपल्याच बाहणीची टिंगल उडवली नाहीत तर,, *उद्या रस्त्यावर मेणबत्या घेऊन फिरावं लागणार नाही* जय श्रीराम भूमकर सुनील प्रभाकर भूमकर राखिपौर्णिमेच्या खूप साऱ्या अक्षय शुभेच्छा🌺🌻🌹🌷🌼🌸💐

खरा नटरंग- गणपत पाटील अशा माणसाला,,,,????

खरां नटरंग गणपत पाटील !! चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू अतिक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण 'अशा' माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट... नेटमुशाफिरीत रवि जाधवांची मुलाखत वाचली अन त्यांच्या त्या घटनेची आठवण झाली दूरदर्शन वरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली… त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली एन एका कलाकाराची जिंदगानी कशी उद्धवस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते. ती घटनाच तशी होती मुलाखतीत ते रडत होते, त्यांच्या आयुष्यातल्या प...

#मॅन_ह्याज_नोन_बाय_द_कम्पनी_विच_हि_किप्स

आज राहून राहून त्या माझ्या दामले सरांची खूप आठवण येते मी 6/7 वीत असेंन त्यांच्याकडे शिकवणीला जात असे विंगर्जी सोडून बाकी साऱ्या विषयात मी बरा होतो हुशार नाही आणि ढ देखील नाही पण विंगर्जी मात्र बोंब ठरलेली अगदीच नापास होत नसे हेच काय ते ते सर बाजूलाच सहजिवंन बिल्डिंग मध्ये राहत असत आणि मी शेजारीच bdd चाळीत एक दिवस ते त्यांच्या गॅलरीत उभे होते आणि मी मुलांसोबत मोठं मोठ्याने भर दुपारी चाललो होतो ओरडत खेळत जाता जाता मी डांगट असल्यामुळे एक चारचाकी उभी होती आम्ही सारेच खेळ म्हणून त्या गाडीच नुकसान करू लागलो हे *सर* वरून पाहत आहेत ह्याकडे माझं काही लक्ष नव्हतं आणि असत तरी आम्ही खेळतोय हे कुणाचं नुकसान हे काही कळत नव्हतं किंवा घेणं देणं नव्हतं झालं तिथून पुढे आमची वरात आणखी दुसरं नुकसान करायला गेलो संध्याकाळी जेव्हा शिकवणीला गेलो तेव्हा शिकवणी संपल्यावर सरांनी आवाज दिला भूमकर जरा थांबा सर सर्वांशी असच बोलत आदराने मान देऊन तर सर पुढे म्हणाले भूमकर मला माहित आहे तुमचं इंग्रजी खूप कच्च् आहे मग मी दुपारी काय प्रकार केला त्याची हजेरी त्यांनी घेतली मी लगेच सर चुकलो माफ करा वैगेरे बोल...

यापुढे नाव दीपा, साक्षी,सिंधुचं ठेवा बाकीच्या नवांना शोभा नाही

*फुकट टाळ्या पिटायला काय जात???* एक चुटकी *सिंधु* र की किंमत तुम क्या जानो शो *भाडे*😆😆😆? *आणि आमच्या देशप्रेमा ला उधाण आलं* आधी दीपा ने पाया रचला आणि साक्षी सिंधूने कळस चढवला पण ,,, *साक्षी सिंधू दीपा यांचं कौतुक करणारे किती जण आपल्या मुलांना या खेळाकडे वळवणार आहेत??*  मला वाटत *अभ्यास एके अभ्यास अस आपल्या मुलां मागे लागणाऱ्या आईवडिलांनी तर बिलकुल कौतुक करू नये* किंवा ज्यांना जागेपणीही माझा मुलगा सचिन तेंडुलकर होणार अस वाटत त्यांनी तर बिलकुल करी नये ती *शोभा डे चुकीचं चुकीच्या पद्धतीने बोलली* पण बाकीच्या भारतीय जनतेला अगदी सर्वानाच त्यांचा कौतुक करायचा अधिकार आहे का?? *त्यांच्या या यशात त्यांचे प्रशिक्षक आईवडील आणि स्वतः त्यांची प्रचंड मेहनत याचा मोठा वाटा आहे* क्रिकेटला सार मोफत पुरवणारे यांनी या खेळांना किती मदत केलीय? आले लगेच एखादी मुलगी मी पहिलवान होणार अस जेव्हा आईवडिलांना सांगत असेल तेव्हा काय विचार येतील तुमच्या मनात जरा विचार करून पहा *फुकट टाळ्या पिटायला काय जातंय???* जिचे पाय जन्मतः अगदी सरळ आहेत ती दीपा मी जिमन्यास्ट होणार त्या दिपला आणि तिच्या प्र...

आज सकाळी सिंधुची दिनचर्या वाचली आणि,,,

*आज सकाळी २१ वर्षाच्या सिंधुची गेल्या ४/५ महिन्यातली दिनचर्या वाचली अन,,* ऑलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिंधूसंस्कृतीचा उदय झाला आहे सारा देश रिओ ने झापटला होता हे 70 वर्षात पहिल्यांदाच अनुभवयास मिळालं आता प्रश्न असा आहे की,, चीन टोकियो सारखे देश जिथे वयाच्या चौथ्या वर्षी मानसी एक मूल ऑलिम्पिक साठी निवडले जाते आणि 12 वर्षाच्या खडतर तापश्चर्ये नन्तर त्याला ओलिम्पिकला धाडले जाते अशा देशांशी टक्कर द्यायला आपले भारतीय जातात निवडले जातात *हेच खरं सुवर्णपदक जिंकल्यासारखं आहे* *डे बाय डे आपली शोभा करवून घेणाऱ्या निलाजर्यांना काय कळणार??* गेल्या ४/५दिवसात एक छान वाक्य फिरतंय,,, *आता पदकं देखील फक्त बायकांनीच जिंकून आणायची का??😊* विचार करण्या जोग आहे निदान आपल्या देशात तरी परिस्थिती खूप अवघड आहे घरकाम,शाळा ,कॉलेज,अभ्यास ,नवरा ,कुटुंब, नोकरी,धंदा सांभाळत वर पदक देखील जिंकून आणायची?? आणि आपल्यकडे  एखादी मोठी स्पर्धा आली की जाग व्हायचं बास,, परवाच वाचनात आलं ब्रिटन *ऑलिम्पिक साठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंवर किमान ५० लाख पौंड खर्च करते* चीन जापान टोकियो आणि इतर सारे द...

विमानात बसावे उंच उडावे अस कुणाला नाही वाटत?

*विमानात बसावे उंच उडावे* अस कुणाला नाही वाटत?? तिलाही वाटलं,, पण तिला फक्त विमानात बसून उंच उडायचे नव्हतं तर ते *विमानाचं उडवायच होत आणि ते हि फायटर,,* हरकूळ खुर्द सुतारवाडी सिंधुदुर्ग इथे राहणारी ती एक सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलगी कोकणकन्या *हर्षदा रासमने,,,* खरं तर तिला लढाऊ विमान वैमानिक व्हायचं होत पण वैमानिक प्रशिक्षण घेत होती तेव्हा महिलांना हवाई दलात फायटर पायलट म्हणून काम करायची परवानगी नव्हती. पण परवानगी नसली तरी मूळचीच *फायटर असलेली हर्षदा* डगमगली नाही तिने पर्याय निवडला व्यावसायिक वैमानिक होण्याचा आणि पहिली महिला वैमानिक व्यवसायिक ती झाली कतार एयरलाईन्स मध्ये,, ' *हो पण हे सारं इतकं सोप्प होत??* आज आपण मारे कौतुक करतो आहोत पण यासाठी तिने आणि त्याच्या आईवडीलांनी आणि तिचे काका विष्णू रासम जे हवाई दलात कार्पोरेल पदावर होते या सार्यांनी तिच्या स्वप्नाला बळ दिल त्यासाठी तिने *अमेरिकेत १५० तासांचे विमाणोड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले अमेरिकेने देखील तिला यासाठी शिष्यवृत्ती दिली* (अमेरिके सारखे देश पुढारले ते या मुळे आमच्या कडे मात्र तुम्ही सबसिडी द्...

*बड़े तो "भाजपा" वाले हैं,🤔❓* *"कभी एजेंडे में रखते हैं और कभी निकाल देते हैं ....!!"*

*"भाजपा और राम"* एक बार हनुमान और हिमालय में लड़ाई हो गई : हनुमान : प्रभु हिमालय आप मुझसे ज्यादा महान हैं, आप माता पार्वती के पिता हैं,माँ गंगा को धारण करने वाले हैं.... हिमालय : हे बजरंग बली, आप मुझसे ज्यादा महान हैं, आप रूद्र के अवतार हैं, अजर,अमर और अजेय हैं ..... तभी सामने से भगवान् श्री राम आते दिखाई दिए, तो हनुमान और हिमालय अपना झगड़ा त्याग दिया और बोले : ना हनुमान बड़ा ना हिमालय, बड़े तो श्री राम हैं....!! तभी श्रीराम बोले : भैया मैं भी बड़ा नहीं हूँ, *बड़े तो "भाजपा" वाले हैं,🤔❓* *"कभी एजेंडे में रखते हैं और कभी निकाल देते हैं ....!!"* 😡😆😡😆😡😆