आणि डॉ काशीनाथ घाणेकर,,, युट्युब , पहिली झलक सिनेमाची आली आणि सुबोध भावे जरी आवडता नट असला तरी डॉ साहेबांच्या भूमिकेला तो अजिबात सूट नाही ही एकंदर सुबोधच्या गोबऱ्या गालावरून मी कल्पना करून घेतली😏😏 छ्या हा कसला काशीनाथ घाणेकर शोभतोय? कारण घाणेकर म्हणजे बारीक चणीचा , घाऱ्या डोळ्यांचा, बेबंद, बेदरकार, आग्रही , बेपर्वा, मला कोण काय बोलताय ,याही पेक्षा मी बोलतोय ते लोकांना आवडलंच पाहिजे आणि ते आवडण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला करेन त्या कामात आपली छाप सोडणारा,,,, हा असला काशीनाथ सुबोध भावेना कसा जमेल🤔❓ ह्या विचारात असताना घरी मामा आला म्हणून चिरंजीव म्हणाले दादा आम्ही जातोय सिनेमा ला तुम्ही येताय का? कुठला? डॉ काशीनाथ,,, सिनेमा पहायला आशा द्विधा मनस्थितीत गेलो आणि पाचव्या मिनिटालाचा सुबोध भावेंनी संभ्रम दूर केला,,, मी जसा संभ्रमात होतो त्याच प्रमाणे त्या सिनेमात दाखवलेले मा दत्ताराम देखील ,, कारण ते संभाजीवर चित्रपट बनवत असतात आणि संभाजी म्हणजे 6 फूट उंची मजबूत बांधा आणि घाणेकर म्हणजे किरकोळ शरीरयष्टी वर घारे डोळे? हा कुठून संभाजी करणार चल हो बाहेर अ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......