तमसो मा ज्योतिर्गमय... दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अंधारावर मात करणारी रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ... प्रत्येकाला दिवाळीच अप्रुप असतच मग तो गरीब असो वा श्रीमंत .. कुणाची फटाक्यांची तर कुणाची फराळाची, नवीन कपड्यांची आणि आताशा नविन मोबाइलची पण धुंधी ही असतेच दिवाळीची , मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत कुणी मेल करत कुणी मीठाई पाठवत अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते, पण,,, आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते , असा म्हणतात , सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात, तो समाज जीवंत आहें असे समजले जाते पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,, जगातिकी करनाच्या जमान्यात आम्ही आगतिक झालोय अस नाही वाटत? परस्पर सीमारेषा धूसर होत आहेत आपली मानस दुरावतायतात ,परस्पर संवाद कमी होत आहेत दिवाळी हा एक आनंदोत्स्व आहें तो कोरड्या मनाने कोरड्या शुभेच्छांनी नाही साजरा होत . दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात. त्यांच्या गैर हजेरित हा सण साजरा ...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......