#बंडातात्या,,,,
काल ,,, उद्धवजींना सांगितलं पांडुरंगाच्या पूजेला तुम्ही येऊ नका तो पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही,,,,
(खरतर माझा गैरसमज असेल पण माझं मराठी खूप चांगलं आहे आणि त्या माझ्या मराठीत खूप चांगलं उत्तर देऊ शकलो असतो पण ते टाळतो असो,,,)
पण पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही हे तुमचं विधान ऐकल्यावर एक लक्षात आलं की तुम्हला #वारी कळलीच नाही,,,
आता वारीला का जावं हे ही सविस्तर सांगत नाही पण साधारण 25 वर्षापूर्वीचा माझ्या समोर घडलेला प्रसंग सांगतो (आपल्याकडे #दृष्टांत म्हणतात त्याला,,)
माझे तात्या विणेकरी त्यामुळे मला दर्शनाला कधी अडचण आलीच नाही पण एकदा मात्र चुकामूक झाली आणि तात्या पुढे निघून गेले
आता काय करायचं दर्शन कस घ्यायचं,,,?
मग ओळख पाळख काढत मी कसा बसा दर्शन बारीत घुसलो तास दोन तासात तिथे आजूबाजूचे वारकरी यांच्याशी गप्पा ही मारायला लागलो साधारण नन्तर लक्षात आलं की एक माझ्या 10/12 मागे एक वारकरी उभा होता जो आंधळा होता
तो पर्यंत मी माहिती काढली होती वारकरी किती दिवस झाले रांगेत उभे आहेत मग मात्र माझं कुतूहल जाग झालं ,,
राहवलं नाही मला कारण लोक सारी 2/3दिवस झाली होती रांगेत उभी होती आणि त्यांच्या बरोबर तो #आंधळावारकरी ही रांगेत होता,,,
मी त्या वारकऱ्याकडे गेलो आणि विचारलं माऊली काहो तुम्ही सुद्धा 3 दिवस रांगेतच उभे आहात का?😲🤔☹️
वारकरी:- हो
मी:- अहो मग इतकी रांग का लावली तुम्ही
तुम्हला तर दिसत ही नाही🤔☹️
#बंडात्यात्या,,,, त्या वारकऱ्याने दिलेलं उत्तर आज 25 वर्ष होऊन गेली पण विसरलो नाही,,,
तात्या तो वारकरी #आंधळावारकरी म्हणाला,,, आर लेका मला दिसत नाही हे ठाऊक हाय मला त्याच दर्शन होणार नाही हे बी ठाव हाय मला पण #इठोबाला तर दिसत ना त्यामुळे नको चिंता करू
#बंडातात्या तुम्हीही नका चिंता करू
आमच्या बी इठोबाला दिसत कोरोना काळ आहे त्यामुळे वारी नाही होत
#बंडातात्या पण शेवटी राहवत नाही म्हणून बोलतोच शेवटी तुम्हला वारी कळलीच नाही हो ,,,,,😏
#कर्ताकरविता_वेगळाची
बंडातात्या मी वारी केली अस कधी होत नसत हो अहो ती विटेवर उभी असलेली माऊली आपल्याकडून वारी करवून घेत असते त्या माऊलीची इच्छा नसेल तर,,,,
दिंडी आपल्या घरावून गेली तरी वारीच दर्शन घडत नाही आणि पंढरपुरात जाऊनही दर्शन घडत नाही
नर्मदेतला प्रत्येक दगड हा शाळीग्राम नसतो
काही आयुष्यभर गोटेच राहतात
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
Comments
Post a Comment