|| श्री नथुरामाय नमः || जपान सारखे देश पुढे का आहेत,,,, खेळाडूच पण दोन देश वेगवेगळे,, एक देश अजूनही 21 व्या शतकात जायच्या बाता मारतो आणि दुसरा देश 21 व्या शतकाच्याही कित्येक मैल पुढे आहे कारण त्यांना त्यांच्या देशाप्रती असलेला धर्म बजावणे म्हणजे येताजाता क्रिकेट खेळणे त्यावर बंदी घालणे शत्रूचा समाचार क्रिकेटच्या ब्याट घेणे मग भले ते आमच्या सारहद्दीत घुसून आमच्या जवांनांची शिरकमल कापून नेतील पण आम्ही खंबीर आहोत अरे क्रिकेट खेळायला तर बघा कशी बंदी घालतो अरे क्रिकेट खेळायला तर या नाही तुम्हाला हरवलं आणि ते हि शुक्रवारी तर तर तर ,, बस तर आणि तर जसा राजा तशीच प्रजा खर तर जशी प्रजा तसा राजा हवं का?? हे म्हणजे कोंबडी आधी कि अंड आधी असच झालं,,, असो,, जागतिक स्तरावर तुमचे कितीही मोठे नाव असो नियम म्हणजे नियम संघाची शिस्त मोडली तर शिक्षा हि मिळणारच,, *मोमोता* बेडमिंटन रेंकिंग मध्ये आजच्या घडीला दुसर्या क्रमांकावर असलेला हा खेळाडू,,, ज्याने गेल्या ऑगस्ट मध्ये वर्ल्ड च्याम्पियनशिपमध्ये ब्राँझ पदक मिळवले होते जपानचे हे वर्ल्ड च्याम्पियनशिप मधील पहिलेच पदक त्याम...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......