अयोध्या हुन परत आल्यावर त्यांची आई कौशल्या हिने विचारलं रावणाला मारलं ? तेव्हा श्रीरामांनी सांगितलं,, महाज्ञानी, महाप्रतापी, महाबलशाली, प्रखंड पंडित, महा शिवभक्त, चारी वेद ज्याला मुखोदगत शिव ताण्डवस्त्रोत स्तोत्र ज्याने रचलं त्या रावणाला मी नाही मारल,,, *त्याला त्याच्यातल्या मी ने मारलं* या आपण हि आपल्यातल्या अहंकाराला संपवू या दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा भूमकर सुनील प्रभाकर भूमकर
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......