Skip to main content

Posts

Showing posts from May 19, 2019

त्या दिवशी खर्या अर्थाने मदर्स डे साजरा होईल

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते, उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात ... राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन. म...ुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू...

रंग,,,

निवडणुकीची रणधुमाळी tv वर आणि बाहेरही चालू होती,,, एकंदरीत सर्वच प्रचार प्रसार माध्यमांनी मोदींना झुकत माप दिल होत,,, आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे नातू महाराज हातात पेन्सिल घेऊन चित्र रेखाटत होते हातात वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे नाचवणारे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांच्या झेंड्यांचे रंग त्याला जस जमेल तस तो रंगवत होता आणि नेमका माझं लक्ष नसताना tv त गुंग होतो बातम्या ऐकत त्याने अचानक त्याने प्रश्न केला दादा या दोघांना कुठला रंग देऊ?? आणि माझ्या तंद्रीतुन बाहेर आलो,, म्हंटल कुणाला रे बघू,, म्हणत त्याच चित्र हाती घेतलं तर त्याने अगदी बरेचसे योग्य रित्या कार्यकर्ते त्यांचे पक्ष त्यांचे झेंडे अगदी साजेसे रंग त्यात भरले होते,, त्यात कम्युनिस्ट ते वंचीत त्यांचे हिरवे निळे लाल,,, काँग्रेसचा तुटलेलता पंजात धरलेला तिरंगी ,,तिरंगी शाल अंगावर पांघरले सोनिया राहुल ,, बेरकी पवार त्यांच्या निधर्मी रंगात घड्याळाची  टिकटिक हिकमतीने थांबवलेला तिरंगी झेंडा, सारे हिंदुत्व मानणारे त्यांना साजेसं भगवे रंग,, असे सारे मुक्तहस्ते रंग भरूनही त्याला या दोन नेते कुठल्या रंगात रंगवायचे ते कळत नव्ह...