दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल "प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ? क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,, मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का? पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,, आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,, त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही. मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही) आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,, आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे, काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,, आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत, आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,? बर मदत म...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......