मेडिक्लेम वर गुंतवणूक करण्यापेक्षा आज स्वतःमध्ये गुंतवणूक करा पण खालील कारण देऊ नका *व्यायामासाठी दिली जाणारी कारणं.......* 1) जॉब हेक्टिक आहे ( कुणाचा नसतो ?) 2) वेळच मिळत नाही ( सर्वांनाच 24 तास मिळतात !) 3) खूप काम असते ( रिकामटेकडा कोण असतो ?) 4) अभ्यास खूप असतो कॉलेजात ( काय दिवे लावणार आहात ?) 5) घरी जाऊन पण काम असते ( आम्ही पण कामं करतो !) 6) लग्न झालं आता ( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !) 7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो ( तेवढा व्यायाम पुरेसा वाटतो का ?) 8) आता कोण बघतंय आमच्याकडे ? ( मग घराबाहेर पडूच नका !) 9) मला गरजच नाही व्यायामाची ( *सर्वात मोठा गैरसमज ...*) 10) हे जिम , व्यायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत ( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?) 11) जिमची फी परवडत नाही ( घरी करायला किती पैसे लागतात ?) 12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं ( अर्धा तास काढता येत नाही स्वतःसाठी ?) 13) घरी आल्यावर आराम करायचा की व्यायाम करत बसायचं ? ( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?) *हुश्श !!!* यापेक्षा मोठी लिस्ट होईल. मित्रांनो , कारणं खूप देत...
हा आहे आठवणींचा जागर ,मी वाचलेल्या गोष्टींचा ,अनुभवलेल्या विचारांचा,त्यावर पोसल्या गेलेल्या माझ्या स्वभावाचा , माझ्या बापान मला लहानपणीच सांगितलं होत जो वाचत नाही तो वाचत नाही काय कळल होत कुणास ठावूक ? अभ्यास नाही केला पण पुस्तक मात्र गोष्टीची जरूर वाचली. त्या वाचनाची गोडी लागली आणि माझ्यातला मी घडत गेला .त्याच हे सुंबरान तुमच्या चरणी भय शून्य चित्त होण्यासाठी .......